आरोग्य

रक्तदान हेच श्रेष्ठदान :-श्यामजी रायेवार शिवशंकर गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

 

हिमायतनगर प्रतिनिधी / 

शहरात दरवर्षी बजरंग दल व शिवशंकर गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते या वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन आज दी 31 ऑगस्ट 2020 रोजी कालिंका मंदिर येथे करण्यात आले यावेळी बोलताना शामजी रायेवार सर यांनी असे सांगितले की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे सर्व नव तरुणांनी या देश हिताच्या कामात सहभाग घ्यावा असे त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले

शिवशंकर गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष कुणाल राठोड हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन हे उपस्थित होते
यावेळी उपस्थित नवतरुण युवकांना मार्गदर्शन करतांना नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी असे सांगितले की शहरातील जास्तीत जास्त नव तरुणांनी या स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हावे व आपण रक्त दान केल्यामुळे शरीरात नवीन रक्त येते त्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते असे त्यांनी सांगितले

यावेळी डॉ.प्रसाद डोंगरगावकर,जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तुप्तेवार,डॉ कदम साहेब, ज्ञानेश्वर पंदीलवार, कालिंका मंदिर कमिटीचे रामदीनवार काका, अशोक अनुगुलवार, पोलीस कांबळे साहेब, बडवे महाराज, राजू जयस्वाल, बजरंग दल तालुका संयोजक गजानन, बंडूभाऊ अंनगुलवार ,विपुल दंडेवाड सुधाकर चिठ्ठेवाड ,अजय बेदरकर गणेश रामदींवार, शितल सेवनकर, मंगेश धुमाळे,ओमकार बोडके, दुर्गेश मंडोजवार , सोहम चायल, अमोल लुमदे ,पमु नागेवाड सह शिवशंकर गणेश मंडळाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *