अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई ठार
प्रति. बिटरगाव / राजेश पिटलेवाड
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस शिपाई शासकीय कामासाठी यवतमाळ कार्यालयांमध्ये टपाल घेऊन जात असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निंगणुर शिवारामध्ये घडली आहे.
बिटरगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार पोलीस शिपाई निलेश बबन हे आपल्या कार्यालयाची टपाल घेऊन, कार्यालयीन कामाकरिता यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालयात जात असताना, निंगणुर घाटामध्ये सकाळी अकराच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांची दुचाकी वाहन व पोलीस शिपाई निलेश बबन नाल्यामध्ये कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस शिपाई बन यांचे शव विच्छेदन करण्या करिता ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी आणण्यात आले होते. त्यावेळी आपले कार्य बजावताना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
सदर घटनेचा तपास बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाय संदीप राठोड गजानन खरात रवी गीते सतीश चव्हाण हे करत आहे