हिमायतनगर येथे संत श्री शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी. संत वचनाचा अंगीकार करावा :-तलाठी पुणेकर साहेब
हिमायतनगर / तालुका प्रतिनिधी
नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे महान संतश्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी आज दि 17 ऑगस्ट रोज सोमवारी श्री परमेश्वर मंदिर येथे साजरी करण्यात आली. यावेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड व नाभिक समाजाचे कर्मचारी तलाठी दत्तात्रय पुणेकर साहेब,शिक्षक कोंडामंगल सर,साई दादा कट्टावार यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी बोलतांना तलाठी पुणेकर यांनी असे सांगितले की संत वचनाचा अंगीकार करून सर्व समाज बांधवांनी आपण आपल्या भावी कार्यात कार्य करावे नाभिक समाज बांधवाणी विशेषतःहा नव तरुण युवकांनी व्यसनाधिनते कडे न जाता शिक्षण क्षेत्रा कडे जास्त भर द्यावा जेणे करून आपला समाज प्रगतीकडे वाटचाल करेल असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले त्यानंतर हिमायतनगरचे कर्तव्य दक्ष नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना नाभिक समाज बांधवांनी समाज मंदिराच्या जागेची मागणी केली त्या संदर्भात नगर पंचायत च्या कर्मचार्यांशी विचारणा करून त्यांनी आज संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य समाज मंदिर उभारण्या साठी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला त्यामुळे सर्व समाजबांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले
यावेळी उपस्थित महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका अध्यक्ष गजानन चायल,युवा तालुका अध्यक्ष राजूभाऊ सुरजवाड,गणेश वाघाबरे ,रवी जोंनापल्ले,नागेश शिंदे ,शहर अध्यक्ष अवधूत गायकवाड, यशवंत तेलंग,ज्ञानेश्वर लिंगमपल्ले,रवी घुंगरे,बालाजी शिंदे,बालाजी लिंगमपल्ले,सोनू गायकवाड, विशाल भाऊ घुंगरे ,सोनूभाऊ तेलंग,माधव लिंगमपल्ले,विशाल शिंदे सह आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते