ब्योरो रिपोट दिग्रस प्रतिनिधी
जिल्ह्यातील शासकीय ,निमशासकीय तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयामध्ये सैनिकांची कामे वेळेत होण्याकरिता प्रथम प्राधान्याबाबतचे फलक लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करावे असे निवेदन तहसीलदार राजेश वझीरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
भारतीय सैन्य दलामध्ये कोबरा कमांडो म्हणून लायगव्हान येथील गौतम विठ्ठल धवणे,सुरेश रामहरी अंबलडेरे हे झारखंड राज्यात नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत आहे. भारतीय सैन्यामध्ये राहून आपल्या माय भूमीच्या रक्षणाकरिता जीवाची पर्वा न करता अविरत सेवा करीत आहे. ड्युटीवरून काही दिवसाकरिता सुट्टी मध्ये आल्यानंतर आपले व कुटुंबातील विविध कामे करायचे असते. परंतु अनेक शासकीय कार्यालयात व बँका मध्ये इतर नागरिकाप्रमाणे त्यांना तासनतास रांगेत उभे राहून कामे करावी लागतात. परिणामी वेळेच्या अभावी कामामध्ये अडथळा निर्माण होऊन कामे होत नाही त्यामुळे कामे प्रलंबित राहतात. अनेक कार्यालयात कुचंबणा सुद्धा होते. विशेष बाब म्हणजे झारखंड राज्यामध्ये काही जिल्हाधिकारी महोदयांनी सैनिकांसाठी सर्व शासकीय व निमशासकीय बँका व कार्यालया मध्ये सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी फलक लावण्याबाबतचे आदेश दिले आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे. तसेच फलक लावण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील सैनिकांना सुद्धा तसेच सोय-सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.