विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
हिमायतनगर: तालुक्यातील कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून हिमायतनगर मधून ६ जण मुक्त झाले असून सोमवारी 6 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती हिमायतनगर येथील वैधकिय अधिकारी डॉ.डी.डी.गायकवाड यांनी दिली आहे
शहरातील कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या ६ रुग्णांपैकी 2 रुग्ण positive आले होते या रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्याने केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनूसार त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.
शहरातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना सोमवारी दुपारी१२:२० च्या सुमारास कोरोनामुक्त घोषित करुन घरी सोडण्यात आले आहे. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी टोंगे मॅडम पोलीस निरीक्षक श्री भगवान कांबळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. डी डी गायकवाड तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. पोहरे ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव भुरके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत
६ रुग्णांना पुष्प गुच्छ देवून घरी सोडण्यात आले. यातील एक किनवट तर एक स्थानिक रहिवासी होते. या सर्व रुग्णांना आवश्यक त्या सूचनांसह ७ दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोनाचे विषाणू हे सात दिवसात नष्ट होतात. दहा दिवसानंतर कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाहीसा होतो. त्यामुळे अशा रुग्णांना घरी सोडण्यास हरकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याच सूचनानुसार हिमायतनर येथिल कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हिमायतनगर कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. उर्वरीत सर्व जण कोरोना निगेटिव्ह होते. अहवालाचे प्रमाण पाहता मोठ्या प्रमाणात रुग्ण असतील ही भीती आता दूर झाली आहे. रहीम नगर परिसरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. ग्रामीण रुग्णलया चे डॉ. डी डी गायवाड व तालुका आरोगय अाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रहीम नगर परिसराला कन्टेन्टमेंट झोन घोषित करुन आवश्यक ते सर्व सर्व्हेक्षण तसेच या भागात ये-जा करण्यास बंदी घातली आहे.