आरोग्य

राजकुमार टाकीजवळ वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रतिनिधी पुसद

पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राजकुमार टॉकीज जवळ एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. भीम टायगर सेने चे जिल्हा अध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी पोलिस स्टेशन ला कळवले व शहर पोलिस घटनस्थळी पोहचले हा मृतदेह शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
कचरू राघोजी वाघमोडे वय 70 वर्षे अश्या मृतदेह आढळलेल्या इसमाचे नाव आहे. सकाळी परिसरातील काही नागरिक फिरत असताना एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होताच मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *