ब्योरो रिपोट / एस.के.चांद
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या असतांनाही केंद्र सरकारने इंधनाच्या किंमतीत केलेली भरमसाठ वाढ ही तात्काळ कमी करण्याच्या मागणीसाठी दि.6 जुलै रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण साहेब व आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हिमायतनगर तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर शहर अध्यक्ष संजय माने यांच्या उपस्थितीत तहसिल यांना निवेदन देण्यात आले
कोरोनामुळे संपुर्ण जग चिंताग्रस्त असतांना केंद्र सरकारने इंदधानाचे दर वाढवल्याने वाहन धारकांना याचा आर्थीक फटका सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असतांना देखील मोदी सरकारने इंधन दरात केलेली वाढ निषेधार्थ असून ही इंधन वाढ त्वरीत मागे घेण्याच्या
मागणीसाठी तालुका कॉग्रेस कमिटी व शहर कॉग्रेस कॉग्रेस कमिटीच्या वतीने तहसिल कार्यालयासोर धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन नायबतहसिलदार तामसकर साहेब यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर शहर अध्यक्ष संजय माने,माजी जि.प.सदस्य सुभाषदादा राठोड,गणेशराव शिंदे,मा.नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद,मिर्झा मुनवर बेग,शिवाजी माने,सेवादल तालुका अध्यक्ष रामराव सूर्यवंशी,प्रवीण कोमावार,शेख रहीम मीरासाब,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशि,परसराम ढाले,दिलीप पार्डिकर,परमेश्वर गोपतवाड,पंचफुला बाई लोने,शाम जक्कलवाड,गणेशराव आरबटवार,कानबा पोपलवार,परमेश्वर जाधव ,पंडित ढोणे,सह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते