• उमरखेड तालुक्या तील तरोडा गावातील ग्रामसेवक यांच्यावर ४ वर्ष भ्रष्टाचार चा आरोप.
. उमरखेड प्रतिनिधी.
तरोडा तालुका उमरखेड येथील सन २०१७ पासून ग्रापंचायत चा कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे ग्रामपंचयतीमार्फत सन २०१७ ते जून २०२० या ४ वर्षात झालेली सर्व कामे प्रशासक मनमानीने बोगस पद्धतीने झाली आहेत. तसेच बोगस कामे करण्यास प्रशासक तरबेज आहे. म्हणून ४ वर्षा पासून जी काही कामे करण्यात आलेली आहेत त्या कामाचे कॉलिटी कंट्रोल द्वारे चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामपचायत मधील संपूर्ण खात्याची खाते निहाय चौकशी करण्यात यावी. आणि सदरील कामाचे एम. बी. सी. सी. ईस्टूमेंट व्हाउचर बुक सह सखोल चौकशी करण्यात यावी. असे निवेदन माजी सरपंच सोनीताई कुरकुटे. गजानन कुरकुटे. लक्ष्मण सावतकर. यांनी गटविकास अधिकारी पं. स. उमरखेड व सी. ई. ओ. यवतमाळ जिल्हा यवतमाळ यांना देण्यात आले आहे. सदरील कामाचे चौकशी करण्यात येईल की नाही याकडे सर्व गावचे लक्ष वेधले आहे.