विशेष प्रतिनिधी :- नागोराव शिंदे
शहरातिल तहसील कार्यालय येथील भूमि अभिलेख कार्यालयात आज दि 3 जुलै रोज शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयाची एक टीम तहसीलयेथे गेली असता तिथे एकच खळ बळ उडाली की कोरोना रोगाने हिमायतनगर शहरात शिरकाव केला ही बातमी काही शनात संपुर्ण तालुका भर वाऱ्या सारखी पसरली व आमच्या प्रतिनिधिनि ह्याची सविस्तर चौकशी वैधकिय अधिकारी डॉ गायकवाड साहेब यांच्या कडे केलि असता त्यांनी असे सांगितले की एक कर्मचारी नांदेड वरुण नेहमी अप डाऊन करत होता त्यामुळे त्यांना ह्या रोगाची लागन झालि व तो रुग्ण 8 दिवसा पासुन ऑफिस ला सूटि टाकून नांदेड येथे उपचार घेत होता त्यामुळे अखेर आज त्यांचा अहवाल पॉजिटिव आला त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या 6 कर्मचाऱ्यांना हिमायतनगर येथे कॉरनटाईन करण्यात आले आहे आज त्यांचे सव्याप घेण्यात येणार आहे अशी माहिती हिमायतनगर येथील वैधकिय अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधिशि बोलताना दिली आहे
या बाबत सविस्तर व्रत असे की सदया सर्वत्र असंख्य शेतकऱ्यांचे कर्ज माफ़ झाले आहे त्यामुळे नविन कर्ज घेण्यासाठी असंख्य शेतकरी तहसील कार्यालय येथे येऊन कर्ज मीळन्यासाठी लागणाऱ्या कागद पत्राची मागणीमोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत त्यासाठी तालुक्यातील असंख्य शेतकरी सुद्धा तहसील कार्यालय येथे नेहमी येतात त्यातील असंख्य शेतकरी टोच नकाशे मिळवन्यासाठी सुद्धा येथे येतात तेच शेतकरी तोच टोच नकाशा घेऊन शहरातील असंख्य बँका मध्ये जातात त्यामुळे शहरात एकच खळ बळ उडाली आहे की “तहसील चा टोच नकाशा शिरला बँकेत” ह्या मुळे अजुन किती रुग्ण त्या पॉजिटिव रुग्नाच्या संपर्कात आलि आहेत की हे मात्र सांगता येणार नाही ? त्यामुळे आता प्रशासनाच्या डोक्याची चिंतामात्र वाढली असल्याचे सदया तरी दिसून येत आहे
हिमायतनगर शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी तहसीलदार यांना एका निवेदना नुसार अशी मागणी केलि होती की शहरात नांदेड वरुण अप डाऊन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवासी राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी सुद्धा केलि होती पण प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारा मुळे हिमायतनगर शहरात कोरोना णे शिरकाव केला आहे आता त्याचा फैलावन होन्यासाठी तहसील प्रशासन व आरोग्य प्रशासन कोणते पाऊल उचलनार आहे हे पाहने मात्र गरजेचे आहे