हिमायतनगर प्रतिनिधी,
देशासह राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे थैमान घातले असल्यामुळे राज्यातील शाळा आद्दापही सुरू करण्यात आल्या नाहीत परंतु हिमायतनगर शहरात काही टिव्हीशन संचालकांनी शासनाचे नियब धुडकाऊन भरगच्च विद्यार्थी जमा करून टिवशन सुरू केले असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सदरील टिवशन चालकांवर तहसील प्रशासनासह शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हिमायतनगर शहरात कोरोनाच्या लाॅकडाऊन मुळे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येत शहरातील गर्दी होणार नाही यासाठी प्रशासन सुचना देत आहे. नांदेड मध्ये कोरोनाच्या रूग्णांची दररोज वाढ होत असल्याने प्रशासन नागरिकांनी घराबाहेर पडून नये असे आवाहन करीत आहे.
हिमायतनगर शहरात माञ शासनाचे नियम धाब्यावर ठेवत टिव्हीशन चालकांनी एकाच रूम मध्ये शंभर दोनशे विद्यार्थी जमा करून टिवशन घेण्याचा धंदा सुरू केला आहे. याकडे माञ नगरपंचायत सह तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.एकीकडे बाजार बंद ठेवून गर्दी करू नका असे प्रशासन सांगत आहे.दुसरीकडे माञ अवैध टिव्हीशन चालक मास्क,सॅनिटायझरचा वापर न करता विद्यार्थ्यांना धडे देत आहेत.परंतु कोरोनाच्या संकटात ज्ञानाचे धडे टिव्हीशन चालकाच्या जिवारी तर येणार नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे.