आरोग्य

उमरखेड शहरातील सर्व अभ्यासिका ताबडतोब सुरू करा पुरोगामी युवा ब्रिगेडची मागणी

 

ढाणकी शहर प्रतिनिधी // शेख शाहरुख

मागील तीन महिन्यापासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे उमरखेड शहरातील सर्व अभ्यासिका या बंद असून त्या परत सुरू कराव्यात अशी मागणी पुरोगामी युवा ब्रिगेड ने आमदार नामदेवराव ससाने यांच्याकडे केली आहे.

उमरखेड शहरातील अनेक युवक हे मुंबई-पुण्यातील खासगी शिकवणीला न जाता शहरात राहूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतात. त्यांना अभ्यास करण्यासाठी उमरखेड शहरात पाच खाजगी एक शासकिय अभ्यासिका उपलब्ध आहे परंतु कोरोणा मुळे या सर्व अभ्यासिका मागील तीन महिन्यापासून बंद आहेत. लॉकडाऊन च्या टप्प्यानंतर अनलॉक 2 ची प्रक्रिया सुरु झाली आहे परंतु अध्यापही अभ्यासिके बाबत शासन प्रशासन गंभीर नाही. शहरातील जवळपास सर्वच बाबींना सवलती देण्यात आलेल्या आहेत परंतु अभ्यासिकेत बाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेले नाही.

अभ्यासिका बंद असल्यामुळे स्पर्धापरीक्षेची तयारी करणारा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहरात अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण जाणून घेत पुरोगामी युवा ब्रिगेडने आमदार तथा नगराध्यक्ष नामदेवराव ससाणे यांच्याकडे धाव घेत विद्यार्थ्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. आमदार ससाने यांनी देखील याबाबत तातडीने दखल घेत शहरातील सर्व अभ्यासिका या लवकरात लवकर सुरू करण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले.


निवेदन देते वेळेस पुरोगामी युवा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, तालुका सचिव सागर शेरे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे, प्रशांत रुडे, विश्वजीत गवळे, आकाश रुडे, नितेश राठोड, अथर खतीब, मुसब्बीर अली, सय्यद जमीर, बंटी रुडे, विजय पांडे , शाहरुख पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *