हिमायतनगर प्रतिनिधी/ शेख, चांद
अरविंद बनसोडे हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून दिनांक 27 मे 2020. रोजी नाथपवनी येते गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बोर्डाचा फोटो काढत होता.
एचपी एजन्सीच्या मालकाने अरविंद बनसोड यांना बेदम मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करून तुला दलित नेता बनायचे आहे का.मारुन टाकेल तुला आशा धमक्या देऊन मारहाण करण्यात आली.
त्याच ठिकाणी काही वेळाने विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला दोन दिवसाने हॉस्पिटलमध्ये मरण पावला.अरविंद बनसोड निष्पाप उच्चशिक्षित आंबेडकरी कार्याकरत्याचा हत्याकांडाची सी.बी.आय मार्फत चौकशी झाली पाहिजे आरोपीवर ॲट्रॉसिटी एक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणा-या जलालखेडा पोलिस स्टेशनचे पी. आय.यांना आरोपी करून निलंबित केले पाहिजे.म्हणुन हिमायत्नगर येथील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विशाल हनवते यांनी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन सादर केले.
यावेळी विशाल हनवते ,भारिप बहुजन महासंघ युवा शहराध्यक्ष ,धोंडोपंत बनसोडे सामाजिक कार्यकर्ते, प्रमोद हनवते, विकास मनपुरे.