ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी नगर पंचायत येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या पाहून ढाणकी करांची समस्या सोडविण्यासाठी वाॅटर सप्लाय जवळपास 15 वर्षा पुर्वी पासुन पीव्हीसी (कपलिंग) पाईपलाईन काढुन लोखंडी पाईपलाईन टाकुन पाण्याची समस्या सोडविली. कारण पीव्हीसी पाईपलाईन नाल्यातुन गेल्यामुळे बरेच वेळेस पावसाचे पाणी जास्त झाल्यावर वारंवार पाईपलाईन फुटत होती.
किंवा पाण्याच्या दाबाने वाहून जात होती त्यामुळे ढाणकी वासीयांच्या नळाला 15-15 दिवस पाणी येत नव्हते व पाणी आल्यावर नाल्यातील दुषित पाणी नळाला येत होते. दुषित पाण्यामुळे मलेरिया सारखी बिमारी होण्याची दाट शक्यता होती.
आज 15 वर्षा नंतर पि.व्ही.सी पाईपलाईन काढुन लोखंडी पाईपलाईन टाकुन या समस्याचे समाधान झाल्यामुळे ढाणकी वासीयांनी सर्व नगरसेवक, व नगरसेविका यांचे कौतुक केले
या कामाला पाठपुरावा करताना ढाणकी शहराचे उपनगराध्यक्ष हाजी शेख जहीर शेख मौला, पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड, सुभाष गायकवाड, शेख जबार आदी उपस्थित होते