विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
आज दिनांक 6 रोजी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील विरसनी या गावी सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्रतेक्षा भेट देऊन चालू असलेल्या कामाबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त करताना डॉक्टर विपिन इटनकर म्हणाले की प्रत्येक गावात अशा पद्धतीने रोजगार हमीची कामे राबवले तर गावातील मजुरांना काम मिळेल आणि पाणी आडवा पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे सर्वांचा फायदा होईल
जिल्हाधिकारी यांच्या भेटीत विरसणी येथील सुरू असलेल्या कामावर 283 मजूर उपस्थित होते सुरू असलेल्या सर्व कामाची पाहणी करुन जिल्हाधिकारी यांनी दुपारच्या जेवणाचा आनंद सुद्धा मजुरा सोबत त्या कामावरच घेतला आहे
तदनंतर जिल्हाधिकारी यांनी हिमायतनगर येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीची पाहणी केली यावेळी नांदेड जिल्हा मुख्य न्यायाधीश धोळकिया यांच्यासोबत हदगाव चे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर हिमायतनगर चे तहसीलदार एन बी जाधव गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शिवराज सूर्यवंशी तांत्रिक सहाय्यक संतोष वाघमारे लक्ष्मीकांत गाडे मंडळाधिकारी पंगे ग्रामसेवक शैलेश वडतकर रोजगार सेवक सदाशिव पतंगे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती