ढाणकी (प्रति.)
ढाणकी पासून जवळच असलेल्या बिटरगाव येथे कोयत्याने सात वर्शीय चूलत भावाचा खून केल्याची घटना घडली.
गणेष नथ्थू पेंदेवाड वय 7 वर्श असे मृतकाचे नाव असून आरोपी किसन पंेदेवाड यांनी जून्या वादाचा व करणी व कुसळी प्रकरणाचा राग मनाषी धरून दिनांक 04 जून 2020 रोजी भर दुपारी 1 च्या दरम्यान अंगणात खेळत असलेल्या गणेषवर कोयत्याचा वार करून जागीच ठार केले.
सविस्तर वृत्त असे की, नथ्थू पेंदेवाड व किसन पेंदेवाड यांचा श्रीमंतीच्या वादावरून जूनाच वाद होता त्यावरून ते नेहमी भांडत असत.घटनेच्या दिवषी आरोपी किसन पंेदेवाड हा दारूच्या नषेत तराट होवून माझ्या कमाईचे पैसे कुसळी करून नथ्थू पंेदेवाड उडवीतो त्यामूळे मनाषी राग धरून त्याचा मोठा मूलगा गणेष हा अंगणात खेळत असतांना उस तोडीला वापरण्यात येणारे कोयते घरातून घेवून आला आणि गणेषच्या डाव्या बाजूच्या कानाजवळ वार केला. त्यामूळे गणेष हा रक्ताच्या थारोळयात पडला असतांना त्यांची किंचाळी ऐकून घरात असलेली त्याची अज्जी अंजनाबाई पेंदेवाड ही धावतच बाहेर आली. त्यावेळी तिला गणेष जवळ आरोपी उभा असल्याचे दिसले. गणेष ची अज्जी गणेष जवळ येताच आरोपीने मागचा पूढचा कोणताही विचार न करता अंजनाबाईच्या डाव्या बाजूला पोटाजवळ कोयत्याचा वार करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. अंजनाबाईच्या आरडा ओरडयाने घराजवळील नागरीकांनी धाव घेतली असता आरोपी किसन याने स्वताच्या हातावर कोयत्याचा वार करून कोयत्यासह पोलीस स्टेषन बिटरगाव येथे स्वताहाच घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी हजर झाला.
दरम्यान मृतकाची आई संगीताबाई हि रोजंदारीला गेली होती ती आपले मजूरीचे काम आटपून दूपारी दिड वाजता घरी आली असता षेजाÚयांनी तुझ्या मुलाला किसन याने कोयत्याने मारहान केली त्यामूळे तो किसनच्या घरासमोर पडून आहे ही वार्ता ऐकताच मृतकाची आई किसनच्या घरासमोर धावत पळत जावून पाहते तर मुलगा गणेष व सासू अंजनाबाई धोगेही रक्ताच्या थारोळयात पडलेले दिसले हे पाहताच आरडा ओरड केल्याने बाजूलाच असलेले माझे पती नथ्थू पेंदेवाड घटनास्थळी आले. व त्यांनी मुलगा गणेष याला उचलून गावातीलच एका व्यक्तीच्या मोटर सायकलवर ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारा करीता घेवून आले.मी व माझे सासू अॅटोने ढाणकी येथील दवाखाना गाठले असता डाॅक्टरांनी गणेष याला मृत घोशीत करून माझी सासू अंजनाबाई हिला आठ ते दहा टाके पोटाजवळ मारून पुढील उपचारासाठी रवाना केले.अषी फिर्याद बिटरगाव येथे मृतकाची आई संगीताबाई हिने दिली त्यावरून आरोपी किसन पेंदेवाड याच्यावर 302,307 भादवी सह कलम 4,5/25 भारतीय या कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेवून अटक कारवाई व तपास पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्षनाखाली ठाणेदार विजय चव्हाण हे करत आहेत.यावेळी पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये , संदीप राठोड, रवि गीते, निलेष भालेराव, सतीश चव्हाण ,अतिश जारंडे, नरंेद्र खामकर इत्यादी पोलीस कर्मचारी हजर होते.