राजकारण

दोन आमदार एक खासदार असुन हिमायतनगर उमरखेड तालुक्यातील पेनगंगा नदी अजुन हि तहानलेलीच

 

नांदेड हिमायतनगर,विशेष प्रतिनिधी / नागोराव शिंदे

 

जानेवारी पासून पेन गंगा नदी कोरडी ठाक इसापूर धरणाचे पाणी पळसपुरला आलेच नाही
विदर्भ मराठवाडा सिमेवरुन वहाणारी पेनगंगा नदी जानेवारी पासून कोरडी पडली असल्याने तालुक्यातील विरसणी ,दिघी, घारापुर ,हिमायतनगर, रेणापूर, पळसपुर व ऊमरखेड तालुक्यातील चातारी ,बोरी ,कोपरा, माणकेश्वर या गावांना गेले चार महिने पासुन नदी कोरडी पडली असल्याने जनावरांच्या ग्रामस्थांच्या पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

हदगाव हिमायतनगर व उमरखेड तालुक्यातील नदिकाठच्या गावात सध्या भिषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.

इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचेआमदार माधवराव पाटील जवळगावकर व हिंगोली लोकसभेचे खा हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केल्यामुळे पाणी नदीला सोडण्यासाठी मंजुर झाले.परंतु हिमायतनगर तालुक्यातील गावांना आतापर्यंत नदीला पाणी आलेच नाही

हिमायतनगर तालुक्यातील नदीला पेन गंगा नदीपात्राला तीसरा कालवा घोषीत करुन उजव्या आणि डाव्या कालव्याप्रमाणे नदीला पाणी सोडण्यासाठी बोरी ता.उमरखेड नदीच्या पात्रात १९ नोव्हेंबर२०१८रोजी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी१५दिवस धरणे आंदोलन सुरू केले होते.तर शेतकर्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न सुध्दा केला होता

या धरणे आंदोलन ला माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील, तत्कालीन माजी माधवराव पाटील जवळगावकर, आ नागेश पाटील आष्टीकर , बाबुराव कदम कवळीकर, माघवराव देवसरकर, फोनवरून आ.बच्चुभाऊकडु ,भागवत देवसरकर, माजी आ.प्रकाश पाटील देवसरकर.तत्कलीन ऊमरखेडचे आ.नजरधने,मा.आ.विजय खडसे यानी भेट देऊन नांदेड व यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडे नदीला पाणी सोडण्यासाठी मागणी केली होती

जनावरांसह नागरिकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्यामुळे यांनी कायम स्वरुपी पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी
पेनगंगा नदी पात्राला उजव्या डाव्या कालव्याप्रमाणे नदीला तीसरा कालवा घोषीत करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन विधानसभेत तत्कालीन नांदेड चे आ.हेमंत पाटील व आ. बच्चुभाऊ कडू यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यामूळे तात्पुरता पाण्याचा प्रश्न सुटला.

परंतु पेनगंगा नदी पात्राला तीसरा कालवा घोषीत करण्याचे मागणी कडे व नदीला पाणी बारमाही सोडण्यासाठी चे मागणी कडे जिल्हाधिकारी व लोकप्रतीनीधीने लक्ष दिले नाही

२०१९ला इसापूर धरणा८०टक्के पेक्षाही जास्त क्षमतेने भरले असून नदीपात्रातून पाणी सोडले नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील गावांतील नागरिकांना इसापुर धरणातील पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही

पाणी टंचाई निवारणार करण्यासाठी पाणी कालव्या द्वारे नदीत सोडण्याची
मागणी या परिसरातील गावातील हजारो शेतकरी नागरिक करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *