विशेष,प्रतिनिधी :- नागोराव शिंदे
खुलली हो खुलली सर्वच दुकान खुलली, बाजारपेठ फुलली
कोरोना च्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरू होता. १८ मे पासून काही दुकाने उघडण्याची जिल्हाधिकारी यांनी सोशल डीस्टन्सिंगचा वापर करुन परवानगी दिली असल्याने शहरात सर्वच दुकानदाराने दुकान उघडण्याचे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दुकानावरील गर्दीवरून दिसत आहे
सोशल डिस्टन कुठे पाळल्या जात नाही ज्या दुकानाला परवानगी नाही असे दुकानदार अर्धा शटर उघडे करून आत नागरिकांना घेऊन गर्दी होताना दिसत आहे
दुकानदार नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहे. मात्र नगरपंचायत, तहसील प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे
कोरोणाच्या लाॅक डावून काळा मध्ये २२ मार्चपासून व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनचे पालन केले. पोलीस प्रशासन व नगर प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांना दंडही लावला ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन असून काही दुकानदारांना परवानगी मिळाली असल्याने १८ मे पासून दुकाने सुरू झाल्याने दुकानात नागरिकाची गर्दी होत असून शासनाच्या नियमाचे पालन केल्या जात नाही
शहरात सोसल डिस्टन्सिंगचा अभाव असून सॅनिटराजर, मास्क,सामाजीक दुरी इत्यादीचा वापर करताना दिसुन येत नाही.
त्यामुळे कोरोणाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरालगत काही अंतरावर तेलंगणा असुन ,विदर्भातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असून नांदेड येथून अनेक कर्मचारी व्यापारी ये-जा करत आहेत परवानगी नसलेली दुकाने बिनधास्तपणे सुरू आहेत. शहरातील दुकानात गर्दी दिसत असताना सुद्धा नगरपंचायत प्रशासन, तहसील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने हिमायतनगर तालुक्यात कोरोना चा वर्षाव होण्यास वेळ लागणार नाही असे चित्र दिसत आहे.