ताज्या घडामोडी

अभिमान पळसपुर गावाचा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांनी घेतली गरुडझेप

 

युनियन बँक ऑफ इंडिया “एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर क्लास वन”या पदावर अभिजीत वानखेडे यांची नियुक्ती

नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील अल्पभूधारक शेतकरी रघुनाथ चादराव वानखेडे यांचेपुत्र अभिजीत रघुनाथ वानखेडे (व्यवसाय शेती) यांची युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये “अग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर क्लास वन” या पदावर नियुक्ती झाली.

अभिजीत हा एक सामान्य कुटुंबातील पळसपुर ता. हिमायतनगर येथील ग्रामीण खेडेगावात गरीब कुटुंबातील श्री रघुनाथ चांदराव वानखेडे यांचा मुलगा आहे.आई वडील आजी दोन बहिणी एक बहिण डॉ. शुभांगी( बी. एच. एम. एस )व दुसरी बहीण डॉ. पूजा (बी.एच. एम. एस) दोन्ही बहिणी डॉक्टरचा कोर्स करीत आहेत
अभिजित हा

लहानपणापासून खूप हुशार होता त्याने प्राथमिक शिक्षण आपल्या गावी पळसपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले असून त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले .

बारावी सायन्स प्रथम श्रेणीत पास झाला असून मेडिकलला गेला नाही त्याचे एकच ध्येय ते म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन एखादी छोटी नोकरी मिळवायची मग बारावीनंतर त्याने बी.एस.सी एग्रीकल्चरचा डिप्लोमा वारंगा फाटा येथे केला असून प्रथम श्रेणीत पास झाला

नंतर त्याने औरंगाबाद येथे बँकेच्या परीक्षा देऊ लागला. दोन वेळेस अपयश आले परंतु त्याने अपयशाला खचून न जाता त्याने तिसऱ्या वेळेस परीक्षा दिली व त्या परीक्षेचा आज निकाल लागला असून तो प्रथम श्रेणीत पास होऊन युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये “एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर क्लास वन” या पदावर नियुक्ती झाली.

अभिजितने या यशाचे श्रेय आई वडील, आजी व मार्गदर्शक शिक्षक गुरू या सर्वांना देऊ इच्छितो त्याच्या या यशामुळे सर्वत्र पळसपुर नगरीत अभिनंदन होत आहे .आज दिवस त्याच्या साठीआनंदाचा दिवस उजाडला असुन सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे
अभिजीत रघुनाथ वानखेडे यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी अभिनंदन केले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *