प्रतिनिधी, ढाणकी
पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी ते उमरखेड रस्त्यालगत सोईट फाट्याजवळ दोघांना दारूची वाहतूक करताना दोघांना ताब्यात घेण्यात आले.
लॉकडाऊन मुळे सध्या सर्वत्र दारूचे दुकान चार दिवसा अगोदर चालू करण्यात आली. खबऱ्याच्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये. सोबत सतीश चव्हाण यांनी सोईट फाट्याजवळ येऊन त्या थांबलेल्या दोन आरोपींना पोलीसांनी विचारपूस करून सदर आरोपींना त्यांनी ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यानी त्याचे नाव सचिन अनिल कवडे वय 26 व संदीप दयाळ वाठोरे दोन्ही रा. चातारी येथील रहिवासी आहेत असे सांगितले. त्यांच्याजवळ बेकायदेशीररित्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात 72 देशी दारूच्या 180 मिली च्या भिंगरी बॉटल मिळाल्या त्याची किंमत 3744 रुपये आहे .
सदर घटनेचा जागीच पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये यांनी पंचनामा करून दारू जप्त करण्यात आली. त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम व कायद्यान्वये पोलीस स्टेशन बिटरगाव ला आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जायभाये.पोलीस शिपाई सतीश चव्हाण यांनी केलीआहे.