( विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे )
कोरोणा महामारी साथीच्या आजाराचा बचाव करण्यासाठी नांदेड वरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासाठी तहसीलदार एन बि जाधव यांना नगर परिषद अध्यक्ष कुणाल राठोड यांनी दिले निवेदन
सविस्तर व्रत असे की
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील तहसील कर्मचारी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यासाठी आज दिनांक १४ रोजी तहसिलदार यांना कर्मचारी आपल्या नोकरीच्या ठिकाणी मुख्यालयाच्या ठिकाणी हाजर नसुन जिल्ह्याच्या ठिकाणाहून अपडाऊन करत असल्याचेतहसीलदा र यांना कुणाल राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे
राज्यात आणि नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत असून त्याबरोबर नांदेड येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने नांदेड येथुन हिमायतनगर येथे अनेक कर्मचारी ये-जा करत आहेत याची खबरदारी घ्यावी म्हणून हिमायतनगर प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी नांदेड येथे कोरोणा रुग्णांची संख्याही वाढत असल्याने त्यामुळे ये-जा करणारे कर्मचारी यांचा नांदेड येथील कोरोणा बाधीत रुग्णासी संपर्क येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिमायतनगर शहरात दोन महिन्यापासून लाॅक डाऊन च्या काळात तहसीलदार पोलिस प्रशासन नगरपंचायत महावितरण चे कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याचा बचाव करण्यासाठी सावध करण्याचे आवाहन करीत आहे .नांदेड येथे रुग्णांची संख्या वाढत असून नांदेड येथे राहून हिमायत नगर ला ये जा करणारे कर्मचारी त्यांच्यामुळे हिमायतनगर शहरात येतात त्यामुळे कोरोणाचा फैलाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशा नांदेड वरून ये-जा करणारे तहसील व सर्व शासकीय कर्मचारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी राहावे नसता सक्तीच्या रजेवर पाठवावे या मागणीचे पत्र नगर पंचायत अध्यक्ष कुणाल राठोड शिवसेना यांनी तहसीलदार यांना आज दिनांक १४रोजी दिले आहे याचबरोबर शहरातील नागरिकांनी कोरणा संसर्गाचा बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे . अत्यावश्यक काम असेल तर घराबाहेर पडावे आणि कोरोना पासून सावध राहावे असे आवाहन कुणाला राठोड यांनी केले आहे