आरोग्य

हिमायतनगर शहरातील विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे आयोजित अन्नछत्राची सेवा,

 

हिमायतनगर(तालुका प्रतिनिधि)

हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मध्ये 13 व्या दिवशी पण अन्नछत्राची सेवा सुरुच संघाच्या कार्यकर्त्यांचा स्थूत्य उपक्रम अनेक गरजू नागरिकांना 200 डब्याची व्यवस्था

शहरात कोविड 19 कोरोनाच्या लॉक डाऊन काळात स्वतःच्या जेवनाची परवड होत असलेल्या कर्मचारी, आरोग्य सेवक, सफाई कामगार,व पोलिस कर्मचारी व सेवेकरी यांना विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे नित्य दररोज 200 डब्बे पुरवण्याचे काम तालुका विश्व हिंदु परीषद – बजरंग दल व संघाचे कार्यकर्त्यांनी परमेश्वर मंदिर येथून नित्य अन्नछत्र देण्याचे काम करत आहेत,
विश्वहिंदु परिषद बजरंग दल यांनी उचललेल्यां या सामाजीक कार्यात सेवा, सुरक्षा, संस्कार या बिरूदाला साजेस, असे कौतुकास्पद काम मागील आठ दिवसा पासुन शहरातील परमेश्वर मंदिर येथे सुरु आहे त्यात हिमायतनगर शहराचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष कुणाल राठोड हे सुद्धा या समाजकार्यात दररोज जातीने हजर राहुन विशेष लक्ष देत आहेत, शासनाच्या नियमाला अनुसरून ही सेवा सुरू आहे आठव्या दिवशीच्या अन्नछत्रा वेळी राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण प्रांत सयोजक शामजी रायेवार सर यांनी भेट दिली व हिमायतनगर शहरात सुरु असलेला हा अन्नकुंड लॉक डाऊन आहे तो पर्यंत असाच सुरू राहील असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
या वेळी उपस्थित बजरंग दल तालुका अध्यक्ष गजानन चायल,संतोषजी गाजेवार, सावन डाके, योगेश चिल्कावार,बंडूभाऊ अंनगुलवार,अजय बेदरकर,शुभम दंडेवाड,सुधाकर चिट्टेवाड,अनिल शिंदे,किरण माने,ओमकार बोडके,गोकुळ गिरी,स्वामी सर, संदिप मादसवार,दीपक कात्रे,विजय कुमार कल्याणकर,सोनु दादा मादसवार,मंगेश धुमाळे पाटिल,शसुपाल नरहारे,अक्षय पाटिल सूर्यवंशी,शिवम् गाजेवार,प्रशांत हेन्द्रे,दुशांत पार्डिकर, आकाश वानखेडे,हनुमान आरेपल्लू,बालु,ओमकार, सह असंख्य बजरंगी यावेळी उपस्थिती राहून आत्यावशक सेवा करत आहेत,
शहरात कोणिही उपाशी राहु नका निसंकोच पणे श्री परमेश्वर मंदिरात या व दुपारी 12 ते 2 या वेळात विश्वहिंदु परिषद व बजरंग दल यांच्या तर्फे आयोजित अन्नछत्राचा लाभ घ्या असे आवाहन हिमायतनगर तालुका बजरंग दल अध्यक्ष गजानन चायल यांच्या कडुन करण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *