ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यात लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न !

 

नांदेड माहूर,विशेष प्रतिनिधी

देशभरात सत्ताधारी पक्ष व त्यांचे खंदे समर्थक असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्या काही अवास्तव बातम्या येऊ लागल्याने अशा मिडियाना देशभरात गोदी मिडीया म्हणून ओळखले जाते. गोदी मिडीयाचे हे लोण आता अगदी माहूर सारख्या केवळ तीर्थक्षेत्रामुळे जगभर ओळख असलेल्या खेडेवजा गावा पर्यंत पोहचले असून प्रथितयश वृत्त पत्रांतून प्रकाशित झालेल्या वृताचे खंडन करीत संबधिताच्या हवाल्याने अवास्तव वृत्त प्रकाशित करून जणू हुजरेगिरित पुरस्कार मिळवण्याची स्पर्धा सुरु झाली की काय असे वातावरण सध्या माहूर तालुक्यात निर्माण झाले असल्याने लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गत दोन वर्षांपासून माहूर तालुक्याच्या पत्रकारीतेत सामाजिक भान नसलेल्या अल्पशिक्षित अनेक सयाजीरावांचा शिरकाव झाला असून अक्षरशा माहूर तालुक्यात थैमान घातले आहे. विशेष मध्ये यामध्ये काही पोलीस दफ्तरी तडीपार पर्यंत कारवाया झालेल्याचाही समावेश आहे. वयाने मोठे असले तरी पत्रकारीतेच्या अनुभवाने आणि शैक्षणिक पात्रतेने कमी असलेल्या या मंडळी चे कर्तव्यशून्य व कामचुकार अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करणे हेच धेय्य राहिले आहे. शब्द पंडीत असल्याचा आव आणत एकानेच मांडणी केलेले वृत्त जसेच्या तसे त्यावर आपली लेखन शैली व स्टाईल न दर्शविण्याची तसदी न घेता अनेक माध्यमातून छापून आणणे व खप अत्यल्प असल्याने सोशल मिडिया व्हाटसप ,फेसबुक च्या माध्यमातून व्हायरल करून आपण खूपच मोठे शब्द पंडित असल्याचा आव हे चंगू, मंगू आणत असून किमान कोरोना संकटकाळाततरी सत्य व वास्तव वृत्त प्रकाशित करण्याचे धैर्य या मंडळीनी दाखवावे अशी मागणी तालुक्यातील सुज्ञ जनतेतून होत आहे.

तालुक्यात काही प्रथितयश वृत्तपत्रांनी कुठलीही समाजउपयोगी बातमी संबंधित अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणासह छापली की, शहरातील सयाजीरावांचा कंपू मार्च एंड आणखी संपन्न झाला नसल्याने त्या निमित्याने कर्तव्यचुकार अधिकाऱ्यांची खुशमस्करी करून कलमलाच उपजीविकेचे साधन बनवत असल्याचे दिसून येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माहूर शहरात काही दिवसापूर्वी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे वृत्त एका प्रथितयश वृत्तपत्रात छापून आले असता केवळ अधिकाऱ्यांची चापलुसी करण्यासाठी या मंडळीनी वन अधिकाऱ्याकडून त्या वृतांचे खंडन करणारे वृत्त चुकीचे अवास्तव प्रतीवृत्त छापून संभ्रम निर्माण केला होता. तर वीज वितरण कंपनीच्या वीजपुरवठ्याबाबतच्या हलगर्जीपणाबाबत वाचकांच्या व जनतेच्या आग्रहास्तव सुरळीत अखंडीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वास्तव वृत्त नामांकित वृत्तपत्रातून छापून आणले होते. त्याचे खंडन करून कलम वर पोट चालवण्याचा प्रयत्न करणारे काही जण आगपाखड करीत असल्याचे सुज्ञ जनतेस निदर्शनास आले असल्याने अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे लोकशाहीच्या चवथ्या खांबांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. वास्तविक शहरातील अनेक भागात उपनगराध्यक्षा यांच्या वार्डातच गेल्या पाच वर्षांपासून कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे लाखो रुपयांची विद्युत उपकरणे, जळाली असून महावितरण कंपनीकडून या मंडळीच्या तक्रारीना केराची टोपली दाखवल्या जात आहे. विशेष म्हणजे माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांचे निवासस्थानासमोरची डीपी तीन दिवसापासून जळाली असून विजेच्या कमी दाबामुळे अनेकांची वातानुकूलित यंत्रे,शीतकपाटे,व इतर उपकरणांना धोका निर्माण झाला आहे. त्याची जायमोक्यावर येऊन चौकशी केल्यास वीज वितरणच्या तथाकथित कार्यकारी अभियंत्याच्या कर्तव्यदक्षतेचा पर्दाफास झाल्याशिवाय राहणार नसल्याने प्रथितयश वृत्तपत्रांच्या जनहितदक्ष वृतांचे खंडन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळीना तो घरचा आहेर ठरेल यात शंका नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *