क्राईम डायरी

तलाठ्यांच्या आशीर्वादाने पळसपुर पेंडावरुन दिवस रात्र वाळु उपसा जोरात

 

हिमायतनगर तालुक्यातुन वाहणाऱ्या पैनगंगेच्या पात्रांमध्ये पाहण्याचा ठणठणाट असल्याने दिवस रात्र वाळु ऊपसा जोरात.महसुल
प्रशासनाचे दुर्लक्ष.

नांदेड हिमायतनगर
विशेष प्रतिनिधी
नागोराव शिंदे

तालुक्यातील पळसपुर,रेणापुर येथुन वाहणाऱ्या पैनगंगेच्या नदी पात्र गेले चार महिने पासुन कोराडी ठाक पडली असल्याने आणि लाॅकडाउनचा फायदा घेत वाळु तस्करांचा मोर्चा पळसपुर, रेणापूर रेती घाटा कडे वळला असल्याने दिवस रात्री वाळु ऊपसा जोरात सुरू असल्याचे दिसून येते आहे

कोरोणा संक्रमणाच्या काळात सकाळी आठ ते बारा पर्यंत ढील आहे. बारा वाजता चे नंतर संचारबंदी लागू असाताना सर्व व्यवहार बंद असल्याने लोक घरात बसुन आहेत तर

वाळू माफीयाने आपले कडे कोणाचे लक्ष नाही समजुन या संधीचा फायदा घेऊन पळसपुर, रेणापूर येथुन दिवसा वाळु तस्करी वाळुमाफिया करित अस्ताना मात्र या सज्याचे तलाठी महाशय आपल्या दुचाकीवरून फेरफटका मारतात मात्र आज पर्यंत एका हि वाळुमाफियाना दंड कि पोलिसात गुन्हा दाखल केला नसल्याने हिमायतनगर तहसीलदार एन बि जाधव यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे बोलले जाते आहे

तालुक्यातुन कोठा,तांडा, एकंबा,सिलोडा येथुन वाळु चोरी होत असल्याची माहिती असुन सुद्धा आतापर्यंत कोणत्याही वाळू माफिया वर कार्यवाही करण्यात आली नसल्याने अखेर ऊमखेडच्या पथकानी मराठवाड्यातील वाळु माफीयाच्या मुसक्या आवळल्या.
तालुक्यातील वाळु तस्करी वर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे रामभाऊ सूर्यवंशी यांनी कळविण्यात आले असुन तालुका प्रशसनाने दखल घेतली नसल्याने वाळु तस्करी चालु कसी आहे .पळसपुर,रेणापुर येथील वाळु माफीयावर कारवाई होईल काय असे पर्यावरण प्रेमी वर्गातुन बोललेल्या जाते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *