आरोग्य

कॉरन्टाईन केलेली मुलं गावामध्ये फिरत आहेत वाई ग्राम पंचायत चे याकडे दुर्लक्ष.

 

प्रतिनिधी रुपेश मोरे (वाई बाजार)

Covid-19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण जिल्हा लॉक डाउन केला.व तसेच गोव्हर्मेंट च्या आदेशानुसार बाहेर गावी अडकलेल्या लोकांना आप आपल्या गावी जाण्याची संधी दिली व गावी गेल्यानंतर त्यांना 14 दिवस कॉरन्टीन करण्यास सांगितले परंतु नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेले वाई तांडा या गावांमध्ये किमान 15 ते 20 लोक हैदराबाद,पुणे,मुंबई,नागपूर,यवतमाळ.या सारख्या ठिकाणाहून आलेले आहे व त्यांना दि.7 मे 2020 रोजी त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले.व त्यांना कोरोन्टाईन करण्याऐवजी त्यांना घरी ठेवण्यात आले व आता ते मूल वाई बाजार गावामध्ये खुलेआम फिरत असल्याचे आपणास दिसून येत आहे.त्यांना कोरोन्टाईन करा अशी मागणी गावातील नागरिक करत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *