गोंडवडसा येथे ऑंटी कोरोना सुरक्षा फ़ोर्स ची स्थापना ग्राम संरक्षणासाठी महिलाही सरसावल्या.
( प्रतिनिधी माहुरंगड )
कोविड १९ चा प्रादुर्भव रोखण्यासाठी गाव पातळीवर स्थापित होत असलेल्या पथकाच्या माध्यमातून गोंडवडसा येथे ग्रामसेविका एस.एस. आळणे व तलाठी एम.टी.बोधे यांच्या नेतृत्वात कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रसाराला आळा घालन्याच्या अनुषंगाने ऑंटी कोरोना फोर्सची ची स्थापना करण्यात आली.
मागील दिड महिन्या पासून गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावात रोगराई रोखण्यासाठी सातत्याने दक्षता घेतली आहे. तसेच ग्रामसेविका एस. एस.आळणे यांनी गावात कोविड १९ आजाराचा प्रादुर्भाव संदर्भात चांगल्या प्रकारे जन-जागृतीचे काम केले आहे-
गावात बाहेरुन येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रत्येका वर सदर पथकातील सदस्य लक्ष ठेवणार आहे.बस-स्टैंड वरुन गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बैरिकेट्स लावण्यात आले आहे.आणि गावातील स्वयंसेवक २४ तास तिथे तैनात राहणार आहे.सदर फोर्स स्थापन करण्यासाठी उप-सरपंच तबसुम अमजद खान ग्रामपंचायत सदस्य शौक़त अली यांनी विशेष परिश्रम घेतले.कोविड१९ एन्टी फोर्स स्थापने साठी आयोजित सभेत फिजिकल डिस्टन्स चे काटेकोर पने पालन करण्यात आले.या समितीत प्रामुख्याने इमरान खान,शेख़ मुशर्रफ़,शेख़ एजाज़,नवाब खान,जुल्फिकार अली,शेख़ ज़ुबैर, भास्कर पुरके,एजाज़ खान,डॉ.ज़मीर शेख़,शेख़ ज़ाकिर,शेख़ मुज़फ्फर इत्यादी स्वयंसेवक बाहेर गावावरून येणाऱ्या जाणाऱ्या वर नजर ठेऊन नवीन येणाऱ्या नागरिकांना योग्य तपासणी करून त्यांना सुरक्षित जागी पाठविण्याची जबाबदारी सदर सुरक्षा स्वयंसेवकाची राहणार आहे.कोविड १९ च्या योग्य मार्गदर्शना करीता ग्रामसेविका यांच्या नेतृत्वात अजुन ही गावातील कोविड योद्धा मैदानात स्वयंसेवक म्हणून तयार आहेत.ज्यात दस्तूर-खुद महिला सरपंच सौ.सोनाबाई उत्तम मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य रमेश रामेलवार व तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.मोफ़ीक अहेमद खान हे सर्व कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या संसर्ग विरोधी लढ्यात ग्रामपंचायत गोंडवडसाला आपले योगदान देणार असल्याची प्रतिज्ञा घेतली.