ताज्या घडामोडी

बिलोली अतिवृष्टी चे अनुदान शेतकरी यांच्या खात्यावर त्वरित जमा करा -मनसे शंकर महाजन 

प्रतिनिधी, बिलोली

बिलोली तालुक्यातील सगरोळीसह आठ गावातील 3661 शेतक-याचे माहे अक्टोंबर व नोहेंम्बर 2019 अतिवृष्टी अनुदान 2 कोटी 8 लाख 99 हजार 368 रुपये त्वरित जमा करण्यात यावी आसे निवेदन मुख्यमंत्री याना ईमेल द्वारा मनसे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यानी दीले

सविस्तर माहीती अशी की बिलोली तालुक्यात 2019 अक्टोंबर नोहेंम्बर मध्ये अतिवृष्टी झाली होती यात अनेक शेतक-याचे पिकांचे नुकसान झाले होते यामुळे या नुकसानीचे फंचनामे करून शासनाकडुन आर्थिक मदत जाहिर करण्यात आली होती ही मदत बिलोली तालुक्यात चार टप्यात वर्ग करण्यात आली पहील्या टप्यात 21 गावातील 10872 शेतक-याना 6 कोटी 37 लाख 89 हजार 354 रुपये देण्यात आले तर दुस-या टप्यात 57 गावातील 25 हजार 226 शेतक-याना 13 कोटी 93 लाख 90 हजार 499 रूपये देण्यात आले तसेच तिस-या टप्यात आठ गावातील 5666 शेतक-याना 3 कोटी 59 लाख 94 हज़ार 674 रूपये अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले त्यातील ब-याचे गावातील शेतकर-यानी अतिवृष्टी अनुदान उच्चल केली आहे
पण चौथ्या टप्यातील सगरोळी,शिंपाळा,टाकळी,खुर्द टाकळी थंडी तळणी,थडीसावळी,तोरण,वलीयाबाद,येसगी,या 9 गावातील 3631 शेतकरी बांधवांची 2 कोटी 8 लाख 99 हज़ार 368 रूपये महाराष्ट्र शासनाकडुन मागील सहा ते सात महीन्यापासुन महसूल प्रशासनाकडे वर्ग केले नसल्यामुळे सदरील 9 गावातील 3631शेतकरी या अतिवृष्टी अनुदाना पासुन वंचित आहेत आता थोड्याच दीवसात शेती मशागत व पेरणीचे दीवस जवळ आल्यामुळे व कोरोना सारखे भयंकर सकंटात शेतकरी आर्थिक नियोजनात चिंतातुर झाला आहे यामुळे या शेतक-याचे आर्थिक नियोजनाची घड़ी बसविण्यासाठी म्हणुन महाराष्ट्र सरकारने सदरील अतिवृष्टी अनुदान त्वरित बिलोली महसूल प्रशासनाकडे वर्ग करून संबधित शेतक-याचा खात्यावर त्वरित अनुदान जमा करण्यात यावे अशा या भयंकर सकंटात सापडलेल्या गोरगरीब शेतकरी बांधवाना सहकार्य करण्याचे निवेदन मुख्यमंत्री याना ईमेल द्वारा मनसे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यानी दीले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *