प्रतिनिधी/पुसद
नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या वार्डा वार्डात नगरसेवक साकिब शाहा यांनी गोर गरीब नागरिकांना पाचशे किटचे वाटप करून समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचे काम केल्याने त्यांचे शहरभरात कौतुक होत आहे.
सध्या कोरोना या महामारी मुळे सर्वांनाच घरात बसण्याची वेळ आली आहे सध्या लॉक डाऊन मुळे सर्वच कामे ठप्प झाले असल्याने मजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नाही.शहरात हजारो गरिबांना कामे नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.अशा गोरगरीब व हातावर आणून खाणाऱ्यांना येथील नगरसेवक साकिब शाहा यांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया चे माजी अध्यक्ष ऍड.आशिष देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. येथील गरजूंना अन्नाची किट वाटप करण्यासाठी तहसील कार्यालयाचे तहसीलदार वाहुरवाघ यांना 50 किट वाटप केल्या त्या वेळेस पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप परदेशी वसंतनगर हे उपस्थित होते.
सोबतच दि.4 ला शहरातील 450 गरजू नागरिकांना गहू तांदूळ साखर पत्ती दाळ साबण किराना किट तयार करून वाटप केली त्यांच्या या कार्याचा शहरात कौतुक होत आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.आशिष देशमुख तहसीलदार वाहुरवाघ ठाणेदार प्रदीप परदेशी शेख मुजीब सिद्दीकी लोहार,सुलतान शाहा,सय्यद मौला आदी उपस्थित होते यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवक साकिब शाहा यांनी वार्डा वार्डात सेनीटायझर ची फवारणी स्वतः केली होती तर कोरोना ग्रस्तांना रक्तदान सुद्धा केले होते हे विशेष.