प्रतिनिधी रुपेश मोरे माहूर :-
बाधित क्षेत्रातून किनवट माहूर मतदारसंघातील गावात येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्यावतीने हातावर शिक्के मारून क्वारंटाईन करण्यात येत आहे,मात्र प्राथमिक तपासणीत नागरिक संशयित नसला तरी बाधित क्षेत्रातून येत असल्याने अशा प्रत्येक नागरिकांची स्वॅब तपासणी करावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे.
जगासह देशाला कोरोनाने चांगलेच ग्रासले आहेत. रोज कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच आहे. यामुळे प्रशासन तर चिंतेत आहेच,सोबत ग्रामीण भागातील नागरिकांची ही चिंता वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक रोजगाराच्या शोधात शहरात काम करायला होते.ते नागरिक दिनांक 14 एप्रिल रोजी लॉक डाऊन वाढल्याने मिळेल त्या वाहनाने किंवा शेकडो कि.मी पायी चालून गावात दाखल होत आहे. अधिकांश नागरिक हे बाधित क्षेत्रातून येत असल्याने त्यांची थर्मल स्कॅनरद्वारे ताप ची तपासणी करण्यात येत आहे.व नंतर होम क्वारंटाईन केल्या जात आहे.मात्र बाधित क्षेत्रातून येत असल्याने अशा प्रत्येक नागरिकांची स्वॅब तपासणी केल्यास कोरोना संसर्गाचा धोका टळू शकतो.त्या मुळे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे.