पुसद वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणू विरोधात लढणारे फ्रंट लायनर – आ. इंद्रनिल नाईक*
पुसद ता.प्र.- मुबाबसिर शेख,
विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांची आज जुनी पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक घेण्यात आली.
तिन्ही आमदारांनी कोरोना मुळे उद्भवलेल्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. राज्य शासनाने त्यांच्या पगारात काही टक्के पगार कपातीची घोषणा केली आहे त्या बाबतीत तिन्ही आमदारानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून संपूर्ण पगार करावा अशी मागणी करणार असल्याची हमी दिली.आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्याकडून PPE किट वाटप करण्यात आले. आमदार इंद्रनील नाईक यांच्या तर्फे मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. डॉ अमोल मालपाणी यांनी PPE किट कशी वापरावी यांचे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
या बैठकीला पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष युवा आमदार इंद्रनील नाईक,विधानपरिषद सदस्य आ डॉ वजाहत मिर्झा
विधानपरिषद सदस्य आ अँड निलय नाईक ,जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हरिभाऊ फुफाटे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशिष पवार व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,
सैय्यद इश्तियाक, रवी
ग्यानचंदाणी, अभिजित पवार,अयुक खतीब,पंकज राठोड उपस्थित होते.