जिल्हा यवतमाळ पुसद स्थानिक गुन्हे शाखेची भरीव कामगिरी जुगारी सह रिती तस्करांना अटक
पुसद तालुका प्रतिनिधी:—-मो.मुबश्शीर
शेंबाळ पिंपरी लगत वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रामधून अवैद्य रेती उपसा होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुसद यांना 27 एप्रिल च्या रात्री अकरा वाजताचे दरम्यान मिळाली.
माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांनी आपल्या सहकार्यांसह पंच सोबत घेऊन घटनास्थळी धडक दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पैनगंगा नदीच्या पात्रामधून रीती तस्करी करणारी वाहने आणि आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पो.स्टे. खंडाळा यांचे ताब्यात दिले.
पो.स्टे. खंडाळा येथे संबंधित रेती तस्करांवर भादवी ३७९, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
रेती तस्करी करणारे आरोपी आशिष उर्फ गजानन शिवाजी टेकाळे वय२५ वर्ष रा. शेंबाळपिंपरी, अजिमोद्दिन सिद्दिकी वय ३५वर्षे रा. शेंबाळपिंपरी, प्रफुल उर्फ पप्पू देविदास काळे वय २५ वर्ष रा. शेंबाळपिंपरी यांचेकडून त्यांच्या ताब्यातील रेती, तीन मोबाईल फोन, तीन ट्रॅक्टर, ट्रॉली, असा एकूण २१ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फुलवाडी ते जामनाईक रोड लगतच्या शेतामधील झाडाखाली जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती २७ एप्रिल रोजी मिळाल्यावरून त्या ठिकाणीसुद्धा पंचा समक्ष धाड टाकून जुगार खेळत असलेले संतोष उत्तम पवार वय ३५ वर्ष, विनायक थावरा राठोड वय ५२वर्ष, रमेश पांडुरंग कांबळे वय ५१ वर्षे, प्रेम थावरा राठोड वय ४७ वर्ष,विलास देवराव चव्हाण वय ६१ वर्षे, भारत राजू सिंग राठोड वय ५१ वर्ष, भिमराव शिवाजी चव्हाण वय ३६ वर्ष, संतोष किसन राठोड वय ३६ वर्ष अशा जुगारींना ताब्यात घेऊन त्यांचेवर कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा २६९, १८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्यांचेकडून १० हजार ३५० रुपये नगद तसेच 6 मोबाईल, सात विविध कंपनीच्या मोटर सायकल असा एकूण २ लाख ८१ हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. पुढील तपास पो.स्टे.खंडाळा हे करीत आहेत.