राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारली देशी दारूच्या दुकानावर धाड तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे आले निदर्शनास
प्रतिनिधी/यवतमाळ,पुसद इरफान शेख,
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री आठ वाजताच्या दरम्यान धाड मारली असता तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे चौकशी अंती निदर्शनात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजेश तायकर यांनी दिली आहे.
सध्या पुसद तालुक्यात करोनामुळे संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना व्यतिरिक्त ईतर कुठल्याही दुकानाला व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. त्यात विशेष करून दारूविक्रीचे दुकानाचा यात समावेश आहे. असे असतानाही येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू विक्री करणाऱ्या कडून छुप्या पद्धतीने व चढ्या दराने विक्री केल्या जात आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजी चौक लगतच्या देशी दारूच्या दुकानात २२ एप्रिल रोजी रात्री १ वाजता च्या दरम्यान उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी धाड टाकली असताना दोन लाख ७४ हजार रुपयाची दारू जप्त केली होती. तीन दिवसानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या मे के.के. ट्रेडर्स या नावाने सरकारमान्य दुकान शिवाजी वार्डमधील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या देशी दारूच्या दुकानाला सील करून ठेवलेली दारूविक्री झाल्याची माहिती मिळाली.
त्या माहितीच्या आधारे दि.२५ एप्रिल च्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान धाड मारली.
येथील दुकानाच्या शेटरला लावलेले सिल तुटलेल्या अवस्थेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आले. दुकानाचे शेटर उघडून आत प्रवेश केला असता दुकानात ठेवलेला माल तपासणी केला असता त्यामधे
३५ बम्पर,निप २५१ व १० हजार आठशे ९० मी मी च्या बॉटल ज्याची एकूण किंमत ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा माल गायब झाल्याचे निदर्शनास आला. सोबतच दुकानाच्या चालक व मालकाने एक दिवसाचे नोंदी सुद्धा रेकॉर्डला लिहिलेच नसल्याचे निदर्शनात आले.त्यावर पंचनामा करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतीश जयस्वाल या चालक मालकाला माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानात ठेवलेलला संपूर्ण माल ताब्यात घेतला असून ट्रान्सपोर्ट पास नुसार तपासणी सुरू केले आहे सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश तायकर व दीपक तसरे यांनी दुकानाला सील केले असून दुकानाचे चालक मालक सतीश जयस्वाल यांच्यावर कारवाई करीत आहे वृत्त लिहोस्तोवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २४ तासापासून कारवाई सुरू होती त्यामुळे गुन्हा नोंद होणे बाकी होते.