वाळकेवाडी येथील सिंगल फेज डी पी ची व्हाट्सअप द्वारे केली होती तक्रार करताच
खासदार हेमंत पाटील यांनी घेतली
हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
तालुक्यातील वाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी सिंगल फेज लाईट साठी व्हाट्सअप द्वारे मागणी केल्यामुळे सिंगल फेज लाईट पंचवीस के
व्हि डि पि खा, हेमंत पा.यांच्यापर्यत्ना मुळें मिळाले असुन सिंगल फेज लाईट चालू झाली.आहे
तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या वडाची वाडी. (वाळकेवाडी)तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे सात आठ महिन्यापासून सिंगल फेज लाईट नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत होती त्यामुळे नागरिकांनी बैठक घेऊन मागणीचे निवेदन खासदार हेमंत पाटील व कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड भोकर, उपविभागीय अधिकारी पंडित राठोड हिमायतनगर यांना व्हाट्सअप द्वारे सिंगल फेज डी पी मिळण्यासाठी निवेदन पाठविले या निवेदनाची दखल हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी घेऊन कार्यकारी अभियंता श्री मोहन गोपुलवाड भोकर व उपविभागीय अधिकारी हिमायतनगर यांच्याशी संपर्क साधून वाळकेवाडी गावाला सिंगल फेज डी पी मिळवून दिला.
या कामात हदगाव हिमायतनगर चे pro भारत वाळके , संजय माझळकर, दत्ता शिरडे, पुंडलिक अंभोरे, नागोजी वागतकर, खंडू नाईक, बालाजी लोखंडे ,श्रीराम देवतळे, परमेश्वर बंदुके, संतोष माझळकर, लक्ष्मण नाईक, यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे सिंगल फेज लाईन चालु झाल्यान त्यांनी खा.हेमंत पाटील यांचे आभार मानले आहे