नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हिमायतनगर येथे नागरिकांची तोबा गर्दी,
प्रधानमंत्री सन्मान योजनेच पैसे उचलण्यासाठी भली मोठी रांग.
बॅंकेच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी त्या वेळी करण्यात आली,
पैसे उचलण्यासाठी दुसरे कंवाटंर सुरू करा शेतकऱ्यांची मागणी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा हिमायतनगर येथे सकाळी सात वाजल्यापासून रांग लागली
प्रधान मंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समोर लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिसत आहे
दिवसभर रखरखत्या उन्हात पैसा उचलण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आले असल्याने पोलीस प्रशासनाचे मदतीने रांगा लावण्यात आल्या असुन सर्वाना तोंडाला मास्क लावून रांगेत उभे राहण्याचे हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे हे स्वता जातिने कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सांगत आहेत व उन्हाळ्याचे कडक ऊन असल्याने सावली साठी बॅंक समोर टेन्टची व्यवस्था करण्यात आली, असून ती अपुरी पडत आहे
तसेच हिमायतनगर येथील दानशूर श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविर सेठ श्री श्रीमाळ यांनी सर्व पैसे उचलण्यासाठी आलेल्या नागरीकांना खीचडी व पीण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती,
प्रतिनिधी -:- नागोराव शिंदे