Tv9माझा लाईव्ह न्यूज, कुरळी टेंभुरदरा जंगलाला लागली भिशण आग.
ढाणकी प्रतिनीधी- इरफान शेेेख,
टेभुरदरा गावापासुन जवळच असलेल्या जंगलाला काल दुपारी 12 वाजता अज्ञात ईसमाने जंगलाला आग पेटवुन दिली. त्यामुळे टेंभुरदरा ते कुरळी यामधील सत्तर ते पंच्याहत्तर हेक्टर मधिल जंगलाला पुर्णतः आगीणे रूद्र रूप धारण केले होते. काल पासुन लागलेल्या आगीला विझवण्याकरीता वन विभागाचे कर्मचारी तसेच टेंभुरदरा ते कुरळी हया दोन्ही गावच्या समाजसेवकांनी मिळुन आज सकाळी आग पुर्णत्व विझवली.
पैनगंगा नदीच्या काठावर असलेले अभयारण्यात अनेक जिवजंतु वास करतात तसेच अनेक पुषुपक्षी ही राहतात. हयाची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी ज्या विभागाची असते त्या विभागाच्या टेंभुरदरा बिट पासुन अगदी असलेल्या जंगलाला आग लागली हयाची पुसटषीही कल्पणा वन विभागाच्या कर्मचा-याला नसावी याचे आष्चर्य नागरीकांना वाटत आहे. कारण उटसुट जंगलाच्या काठावर षेतक-यांना गावातील गुर चारण्यासाठी गेलेल्यांना धारेवर धरणारे नियम व अटी सांगुण त्रास देत असलेले या वेळी मात्र आग लागे पर्यंत काय करत होते?
पैनगंगा अभयारण्यात अनेक मौल्यवाण अषा वनस्पतीची जतन व संगोपण करायला पाहीजे होते परंतु त्याकडे लक्षही न देता कर्तव्य करावे का म्हणुन करणारे तर नाही ना कारण जंगलामध्ये असलेल्या अनेक मौल्यवाण वृक्षांची कत्तल करूण त्या वृक्षाची माहिती दडवण्याकरीता त्याला आग लावली असेल का? असा प्रष्न कुरळी व टेंभुरदराच्या नागरीकांना पडला आहे.
अभयारण्यात अनेक जिवजंतु प्राणी या लावण्यात आलेल्या आगीमध्ये आपल्या जीव गमावावा लागला. अभयारण्यातील प्राणी आपला जीव वाचवण्याकरीता वाट मिळेल त्या जंगलातील दिषेने पळाले. एवढया मोठया प्रमाणावर सत्तर ते पंच्याहत्तर हेक्टर म्हणजे अंदाजे 200 एकर वर लागलेल्या आगीचे रहस्य किंवा लावण्यात आलेल्या आगीचे रहस्य वनविभागाचे वरिश्ठ अधिकारी उकरूण काढतील का? कारण या आगीमागे अनेक कारणे असल्याची चर्चा कुरळी व टेंभुरदरा गावातील नागरीक करत होते. या नागरीकांना जंगलातील इत्यंभुत माहिती असल्या कारणाने ते करत असलेल्या मागणीला वनविभागाच्या वरिश्ठ अधिकारांनी आगीचे कारण षोधुन संबधितावर योग्य ती कारवाई करावी. यामुळे गावक-यांचे समाधान होईल व सत्य परिस्थीती समोर येईल.