यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव अंबोडा येथे हात भट्टी खुलेआम विक्री चालू,
प्रतिनिधी:- महागाव
कोरोनाच्या बंद चा फायदा घेऊन शहरात ऑनलाईन अवैध देशी दारू विक्री तेजित,
पोलिस प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष वरिष्ठानि लक्ष देण्याची मागणी..
सदया महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी कलम 144 जमाव बंदी कायदा लागु केला आहे,त्याची व आपत्ति व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142(1) नुसार जिल्ह्यात 31 मार्च पर्यंत सर्व किरकोळ देशी मद्य विक्री बंदी असल्याचे पाहून महागाव शहरातील व ग्रामीण भागात अवैध देशी विक्री करणाऱ्यानी त्यांचा धंदा ऑनलाईन पद्धतीने मोठ्या तेजित सुरु केला आहे, त्या बाबी कडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे,
अंबोडा येथील चौक परिसरात अवैध हात भट्टी दारूची ऑनलाईन विक्री मोठ्या तेजित सुरु असल्याची माहिती, नागरिकांनी आमच्या प्रतिनिधिशि दिली, महाराष्ट्रा सह भारतावर सदया कोरोना या महामारीचे मोठे संकट कोसळले आहे, त्याचाच फायदा घेत शहरासह तालुक्यातिल ग्रामीण भागामध्ये अवैध हात भट्टी दारू विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ, अल्पवयीन तरुणात व्यसनाचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढुंन अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे, या बाबी कडे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी केलेल्या दुर्लषित पनामुळे महागाव शहर देशी दारू विक्रेत्यांचे ऑनलाईन केंद्र बनले आहे,पाहिजे तिथे अगदी काही वेळातच देशी दारू मिळत असल्याने तळीरामाच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे, शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन बे भाव दराने अवैध दारू वेळेत मिळत असल्याने पिऊन तर्रतर असणारे मद्यपि घरी पत्नी मुलाना चोपुन काढत आहेत, तर ग्रामीण भागातील काही महिला दारू बंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना तक्रारी नंतर फार त्रास होतो, यामुळे कुणी तक्रार करण्यास पुढे येत नाही, पोलीसांन कडे वारवार अर्ज विनती करुण देखील शहरातील व ग्रामीण भागातील अवैध हात भट्टी, देशी दारू बंद होत नाही,
त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक साहेब व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी महागाव शहराकडे व बाजूच्या ग्रामीण भागातील अंबोडा यांच्यावर जातींने लक्ष देऊन शहरात अवैध हात भट्टी ,देशी विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्य अशी मागणी सुजान नागरिक व महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे,