मार्च महिन्याचे वसुली टार्गेट शंभर टक्के पुर्ण करा,कार्यकारी अभियंता गोपुलवाड यांच्या कर्मचाऱ्यांना सुचना, .
नांदेड हिमायतनगर
हिमायतनगर येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात आज भोकर येथील कार्यकारी अभियंता श्री मोहन गोपुलवाड यांनी उपविभागातील सर्व कर्मचारी विज तंत्रज्ञ यांची महत्त्व पुर्ण बैठक घेतली आहे यावेळी कार्यकारी अभियंता श्री मोहन गोपुलवाड यांनी उपविभागातील सर्व कर्मचारी यांना मार्च महिन्याचे वरिष्ठांनी दिले एक कोटी साठ लाख
घरगुती वीज वापराच्या थकित चालू महिन्याच्या पुर्ण वसुली करुन शंभर टक्के टार्गेट पूर्ण करा अन्यथा संबंधित विजग्राहक आपल्या कडील बिलापोटि थकित वीज बिल भरण्यासाठी टाळा टाळ करत असतील तर त्याचा विद्युत पुरवठा खंडित करा अशा सूचना आज त्यानी दिल्या आहेत ,
यावेळी पुढे बोलताना सांगितले की वीज तंत्रज्ञ (लाईनमन) याणी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान सायंकाळी आठ वाजेपर्यंत आप आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज पुरवठा सुरळीत चालू आहे का याची माहिती घ्या कारण यात काही लोक सायंकाळी आकोडे टाकुन चोरुन विद्युत पुरवठा घेत आहेत असे निदर्शनास येईल असे हि कार्यकारी अभियंता श्री मोहन गोपुलवाड यांनी सांगितले आहे, यावेळी उपस्थित हिमायतनगर उपविभागीय प्रभारी अधिकारी पंडित राठोड, शेहरी विभागाचे कणीष्ट अभियंता पि पि भंडगे , ग्रामीण कणीष्ट अभियंता पि बि ननावरे
विज तंत्रज्ञ प्रमेश्वर शिंदे पि बि सुर्यवंशी अब्रार पठाण एस आडेराव कडु पुरी बकवाड वाघमारे सोनुले वजीरे वाघमारे प्रशांत दळवे आडे पठाण ठाकुर आदी उपस्थित होते,
प्रतिनिधी, नागोराव शिंदे