राज्य सरकारने NPR/NRC/CAA विरोधात विधान सभेत ठराव पारित करावा,
वंचीत आघाडीचे पालक मंत्री,आमदारांना विनंती निवेदन
केंद्र सरकारने पारीत केलेला नागरिकत्व दूरूस्ती कायदा देशातील 40% हिन्दू आदिवासी,धनगर,बंजारा दलीत,भटके व विमूक्त समाजाला घातक आहे म्हणून भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही अशा भूमिकेचा ठराव बिधान सभेत पारित करावा ह्या मागणी साठी वंचीत आघाडी चे वतीने विनंती निवेदन मा. ना .श्री संजय भाऊ राठोड पालक मंत्री यवतमाळ जिल्हा ह्याना देण्यात आले.तद्वतच भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा आमदार मा.डाॅ. श्री वजाहत मिर्झा,राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार मा.श्री. ख्वाजा बेग साहेब ह्याना देण्यात आले. ह्या निवेदनावर सरकार गांभिर्याने विचार करेल आम्ही ह्या बाबत सरकारला ठराव पारीत करण्या बाबत पाठपूरावा निश्चितपणे करू असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यांना मा.जिल्हाधिकारी ह्यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता ऊचीत मार्गदर्शन मा.श्री प्रमोद भाऊ ईगळे साहेब ह्याचे लाभले
यवतमाळ शहर अथ्यक्ष लक्ष्मिकांत लोळगे दिनेश करमनकर,कूदन नगराळे,प्रसन्नजीत भवरे,शिवदास कांबळे गूणव॔त मानकर,नंदू मोहोड,प्रमोद पाटील,
व,तालूका अध्यक्ष सचीन शंभरकर ह्याचे नेतृत्वात त्याच्या कार्यकारीणीचे कार्यकर्ते संभाजी लिहीतकर जिल्हा पदाधिकारी मा.राजेद्र तलवारे,राजाभाऊ गणविर,लक्ष्मणराव पाटील ,वासूदेव भारसाकळे,निलेश स्थूल,एमआयएम चे पदाधिकारी एम.साजीद,रहमान सर, महीला आघाडी पूष्पाताई सिरसाट ,करूणा मून संध्या काळे रमाताई कांबळे,धम्मवती वासनिक,सरला चचाणे,ई.मोठ्यासंख्येनी कार्यकर्ते अंपस्थित असल्याचे ॲड. श्याम ख॔डारे जिल्हा प्रवक्ता ह्यानी कळविले आहे.
विशेष :- प्रतिनिधी