शौचालय योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यां ग्रामसेवक,विस्तार अधिकार्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्या संदर्भात आमरण उपोषण
(बिलोली/प्रतिनीधी )
बिलोली तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करोडो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या शौचालयाचा फक्त देखावा करण्यात आला माञ प्रत्येक गावात घाणीचे साम्राज्य असून यास जबाबदार असलेल्या पंचायत समितिचे विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी म न से चे ता.अध्यक्ष शंकर गंगाधर महाजन यांनी पंचायत समितिच्या कार्यालयासमोर दि.२४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसले आहेत.
◼ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात १४४८६ एवढे शौचालय बांधण्यात आले असून एका शौचालयास १२०००रु अनुदान या प्रमाणे १७ कोटी ३८ लाख ३२००० रु एवढा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.तसेच अनेक ठिकाणी शौचालय न बांधताच अनुदान उचलण्यात आले.एवढा अमाप पैसा खर्च करुन आजही ग्रामीण भागात लोटे बहाद्दूरांची संख्या वाढत आहे.स्थानिक प्रशासनाने तर केवळ औपचारिकता म्हणून गावाच्या दर्शनी भागा समोरच हगणदारीमुक्त चे फलक लावून देखावा करत आहे.यामुळे पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाला असून यास जबाबदार व दोषी असलेल्या संबंधित विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांची पारदर्शक पणे चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे.तसेच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शंकर महाजन यांची दूसर्या दिवशी ही आमरण उपोषण सुरुच ठेवले आहे.
विशेष :- प्रतिनिधी