दारव्हा येथे जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
दारव्हा( तालुका प्रतिनिधी):- प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यावतीने दारव्हा येथे नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक -2 व कैलासवासी विरजी भिमजी घेरवरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत जिल्हास्तरीय खेळ ,क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले सुप्त गुण दाखवता यावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यावतीने जिल्हास्तरीय खेळ ,क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 फेब्रुवारीला सकाळी 11.00 वाजता सभापती जि प यवतमाळ विजयभाऊ राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती कालींदा ताई यशवंत पवार ह्या होत्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जलज शर्मा हे उपस्थित होते. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर काका मोहोड तसेच शिक्षणाधिकारी दीपक चवणे, प्राचार्य डायट श्री मिलिंद कुबडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. घनश्याम राठोड, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, उपशिक्षणाधिकारी वासुदेव डायरे, संस्थाचालक मोहनभाऊ राठोड, सभापती प. स. दारव्हा सुनीताताई राऊत, उपसभापती नामदेवराव जाधव, माजी सभापती उषाताई चव्हाण, माजी उपसभापती पंडितभाऊ राठोड, जि प सदस्य अश्विनीताई कुरसिंगे, पंचायत समिती सदस्य सविता जाधव, सिंधुताई राठोड, दारव्हा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. राजू शिंदे, गटशिक्षण अधिकारी सौ. दीपिका गुल्हाने/अजमिरे, विस्तार अधिकारी जिल्हा खेळ व क्रीडा स्पर्धा समन्वयक प्रणिता गाढवे, विस्तार अधिकारी शिक्षण पप्पू पाटील भोयर, जि.प. शिक्षण समिती सदस्य चीतंगराव कदम, मधुकर काठोळे, राजुदास जाधव, सतपाल सोहळे, यशवंतराव पवार, तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. दिनांक 13 फेब्रुवारीला दुपारी 2.00 वाजता या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार असून त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 16 ही तालुक्यातील 194 शाळेच्या विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला आहे.
विशेष :- प्रतिनिधी