कृषी सहाय्यक आणि तलाठी यांचावर कारवाईसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
दारव्हा : तालुक्यातील मौजा कीन्ही वळगी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी अडाण नदीच्या पात्राला लागून असल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पाणी शेतीत शिरून शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान करून शेत खरडून काढले,
यामध्ये प्रथम पंचनामा यादीत शेतकऱ्यांचे नाव दर्शविण्यात आले मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव नुकसानग्रस्त मदत यादीतून वगळण्यात आले, या संदर्भात तहसील कार्यालय दारव्हा समोर साजेगाव येथील शेतकरी रमेश श्यामजी बावणे, रोहिदास उकंडा राठोड हे नुकसानग्रस्त शेतकरी १३/०२/२०२० पासून उपोषणाला बसले आहेत.
सदर प्रकारात संबंधित विभागाचे दुर्लक्षित धोरण , तलाठी आणि कृषी सहाय्यक यांचा मनमानी कारभार जबाबदार असून यांच्यावर कारवाई व्हावी आणि तात्काळ मदत मिळावी अशी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची मागणी आहे, अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे
विशेष :- प्रतिनिधी,