CAA ,NRC,NPR कायद्याला सर्व समाजातून वाढता विरोध शाहिन बाग उमरखेड येथे ‘
हक हमारा आजादी ,हम क्या चाहते आजादी’ च्या घोषणेने आसमंत दणाणला.!
शांतिदूत सौ शबाना खान यांनी हज़ारोच्या संख्येत उपस्थित महिलांना धरने आंदोलनात मार्गदर्शन केले व वॉइलेंटर ची भूमिका निभावली.!
उमरखेडः (तालुका प्रतिनिधि) मोदी सरकारने CAA कायदा पास केला असून NRC व NPR कायदा पास होणे बाकी असतांना देशामध्ये सर्व स्थरातुन *विशेषता मुस्लिम समाजाकडून देशात वाढता विरोध पहायला मिळत आहे .त्याच बरोबर वेगवेगळ्या देशामध्ये वास्त्व्यास असलेल्या नागरीकाकडून मोर्चाच्या माध्यमातून मोठा विरोध पहायला मिळत आहे.गोदी मिडिया मोर्चे, आंदोलने दाखवत नसलातरी आजच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत बातम्या पोहचत आहेत.
देशामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही.बेरोजगारी वाढलेली आहे. दिल्लीच्या शाहिन बाग मध्ये चालू असलेल्या आंदोलनाची दखल जगाने घेतली आहे. या कायद्यामूळे मुस्लिम समाज टार्गेट होत असून भितीचे वातावरण निर्माण केल्या जात आहे असे बोलल्या जाते.
CAA,NPR,NRC यांच्या माध्यमातुन नागरीकत्व सिद्ध करण्याच्या या कायद्यामूळे मुस्लिम समाजाला सोडून इतर परदेशी नागरीकांना नागरीकत्व देण्याचा कायदा पास झाल्याने लोक भयभीत झाले आहेत.त्यामूळे या कायद्याला विरोध करण्यासाठी उमरखेड मध्ये मागील ७ दिवसापासून गफुर शहा मैदान नांदेड रोड उमरखेड येथे दिल्ली येथील शाहिन बागच्या धर्तीवर आंदोलन सुरु आहे.त्याचाच भाग म्हणून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भाषने केली मागील सहा दिवसांपासून सुरु असलेले उमरखेड चे शाहीन बाग़ येथे प्रत्येक दिवशी शेकडो नागरिक धरना देत आहे.
काल दि.८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जामिया मिलीया इस्लामिया विद्यापिठात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याकडून या कायद्याच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने भाषणाचा मोठा कार्यक्रम झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंधू ,भगिनी व शाळकरी मुले हजर होती. इतर समाजातील जागृत नागरीक सुद्धा हा कायदा काय आहे हे ऐकण्यासाठी उपस्थित होते. हा कायदा मुस्लिम समाज विरोधी असून इतरही समाज यामध्ये भरडल्या जात आहे? असेही बोलल्या गेले. हा कायदा रद्द करावा अन्यथा पुणे येथील शनिवार वाडा ताब्यात घेऊन तेथे धरणे अांदोलन छेडल्या जाईल असा दम विद्यापिठातिल विद्यार्थ्यांनी दिला. देशाच्या आजादिसाठी आम्ही कुर्बानी दिली.आम्ही इथे आहो ही मजबूरी नाही.संविधान महिलेची सुरक्षा करते. मुसलमान हे बहाना आहे ,संविधानावर निशाना आहे असे उद्गार डाॅ.नदिम साहेबांनी काढताच इन्कलाब जिंदाबादचे नारे दिल्या या वेळी महिला हज़ारोच्या संख्येने धरना आंदोलनात उपस्थित होत्या महिलांच्या वतीने शांतिदूत सौ शबाना खान यांनी वॉलिंटर ची भूमिका जबाबदार पणे बजावली व ही सभा अतिशय शांततेत पार पडली ,कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता,
विशेष प्रतिनिधी :- उमरखेड