ताज्या घडामोडी

पूर्णा तालुक्यातील आवई इथे मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे शेतातील हाताला आलेले सोयाबीन,कापूस, ज्वारी, इत्यादी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत त्या मुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून मेटाकुटीला आलेला आहे,

TV9MAZA.com नेटवर्क

प्रतिनिधी:- पुर्णा

पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी बदल शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची एक मुखी मागणी पत्रकार कैलास बुचाले व गावातील शेतकरी यांनी निवेदन दुवारे तहसीलदारा कडे केली आहे,

पूर्णा तालुक्यातील आवई इथे मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे शेतातील हाताला आलेले सोयाबीन,कापूस, ज्वारी, इत्यादी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत
त्या मुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून मेटाकुटीला आलेला आहे,


म्हणून पूर्णा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे शेतातील झालेले, नुकासानेचे पंचनामे सर्वे करून त्यांना सर सगट नुकसान भर पायी घ्यावी आशा मागणीचे निवेदन
तहसिलदार यांना कैलास बुचाले व काही शेतक्याने निवेदन दिले आहेत. त्यानंतर निवेदनांची दखल घेत ग्रामसेवक व क्रुषी अधिकारी हे आवई येथील थेट शिवारात जाऊन त्यानी पंचनामे केले.शेतकऱ्यांच्या पिकांना मोडे आले आहेत.
तरी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

प्रतिनिधी:- कैलास बुचाले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *