प्रतिनिधी :- हिमायतनगर
- हिमायतनगर तालुक्यातील मोजे सिरपल्ली गावाच्या एका तरुणावर शेतमजूर शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्युमुखी.
पडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
पांडुरंग विनायकराव जाधव वय ( २८ )
हे रोजच्या प्रमाणे शेतमजुरीसाठी
दयानंद बाबुराव जाधव यांच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेले होते.
शेतात काम करत अस्ताना दुपारी चार वाजेच्या सुमारास आभाळात ढगांची गर्दी होऊन.
विजेच्या कडकडाटा सह जोराचा पाऊस सुरू झाला.
त्याचक्षणी त्याच्यावर वीज पडली आणि ते जागीच गतप्राण झाले,
त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात आणले असून पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद कऱण्यात आली आहे,
त्याच्या पश्च्यांत पत्नी , दोन चिमुकले, व आई वडील ,असा परिवार आहे।
संपादक :- शेख चाँद शेख तैयब