जवळगावकरांना निवडुन द्या – देवसरकर
प्रतिनिधी :- हिमायतनगर
हदगाव विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार माधवरावराव पाटिल जवळगावकर यांना भरघोस मतांनी निवडुन द्या असे आवाहन काँग्रेस आय चे तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर यांनी केले आहे. ते दि. १९ पत्रकारांना माहिती देतांना बोलत होते.
पुढे बोलतांना देवसरकर म्हणाले, २००९ च्या निवडणुकीत विक्रमी मताने जवळगावकर साहेब निवडुन आले असतांना जनतेने दिलेल्या आशिर्वादातुन उतराई होण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातुन मतदार संघात कोट्यवधी रूपयाची विकास कामे केलीत, त्या नंतरच्या काळात त्या पध्दतीने कामे झाली नाहीत, कुठल्याही गावात विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात जवळगावकर साहेबांनी कुचराई केली नाही.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मातोश्री शांताबाई पवार जवळगावकर यांच्या सहकार्याने मतदार संघ, जिल्हयात जिल्हा परिषदेचा कारोभार अतिशय चोख पणे, पारदर्शी सांभाळला आहे, गावातील विकासाच्या संबंधाने करण्यात येणारी कामे असोत कींवा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमी असो, दोन्ही आघाड्यांवर काम करण्यात कधीच कुचराई केली नाही. विकास, जनतेची सेवा हाच आपला आणि पक्षाचा अजेंडा राहिला आहे. मतदार संघातील गोरगरीब जनतेची, सेवा करून विकास साधण्यासाठी मतदारांनी माजी आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहुन भरघोस मतांनी निवडुन द्यावे, असे आवाहन देवसरकर यांनी केले.
यावेळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, रफिक सेठ, संजय शिंदे, शेख मुखीद यांचेसह आदिंची उपस्थिती होती.